esakal | राज्यातील तब्बल एवढे मृत्यू झाले इतर आजारांमुळे; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Death

राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेले ७० टक्के रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी किंवा हृदयविकार यांसारख्या आजारांनी त्रस्त होते. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

राज्यातील तब्बल एवढे मृत्यू झाले इतर आजारांमुळे; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेले ७० टक्के रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी किंवा हृदयविकार यांसारख्या आजारांनी त्रस्त होते. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनासह कोमॉरबिडीटी (इतर आजारांनी त्रस्त) मुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्राकडून कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्याचा अहवाल तयार करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार राज्यातील एकूण मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे इतर आजारांनी त्रस्त असल्याने झाले असून, हे प्रमाण अधिक आहे. तर केवळ ३० टक्के मृत्यू हे कोरोनामुळे झाले आहेत. राज्यात १० ऑगस्टपर्यंत चार हजार १४४ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील दोन हजार ८९८ म्हणजेच ७० टक्के ‘कोमॉरबिडीटी’मुळे आणि एक हजार २४६ म्हणजेच ३० टक्के फक्त मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. 

११ वीसाठी निवडा आवडीचं महाविद्यालय; बुधवारपासून सुरू होणार दुसरा टप्पा!

कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यात पुरुष स्त्रियांच्या तुलनेत अग्रेसर आहेत. अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार पाच लाख दोन हजार ५३१ रुग्णांपैकी तीन लाख ७ हजार ९२६ ( ६१%) पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे; तर एक हजार लाख ९४ हजार ६०५ (३९ टक्के) महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, मृत्यूंमध्येही पुरुषांचा अधिक समावेश आहे. 

'आयटीआय'चा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ; आतापर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी!

तेरा हजार सक्रिय रुग्ण लक्षणविरहित
कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ८६ दिवसांवर पोचला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही कमी झाली असून, सध्या १९ हजार १३२ सक्रिय रुग्ण आहेत; तर यापैकी १३ हजार २९६ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आतापर्यंत ९६ हजार कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा गर्भवती महिला यांनाच कोरोनाचा संसर्ग नाही तर ज्यांना इतर आजार असतील त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू होण्याची संभावना आहे. त्यामुळे अशा लोकांनी ही विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टर करतात.

राज्याची आकडेवारी (१० ऑगस्टपर्यंत)
४,१४४ - एकूण कोरोना मृत्यू
२,८९८ (७०%) - इतर आजारांमुळे मृत्यू झालेले रुग्ण 
१,२४६ (३०%) - कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण
५,०२, ५३१ - एकूण लागण झालेले रुग्ण
३,०७, ९२६ (६१%) - लागण झालेले पुरुष 
१,९४, ६०५ (३९%) - लागण झालेल्या महिला 

ज्या व्यक्तीला आधीपासून ‘कोमॉरबिडीटी’ किंवा कोणतेही दीर्घकालीन आजार असतील त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास मृत्यू ओढावण्याची शक्‍यता अधिक असते. शिवाय ते लवकर बरे होतील, अशी शक्‍यता ही कमी असते. मात्र, जे सामान्य लोक आहेत, ज्यांना इतर आजार नसतात ते कोरोनावर यशस्वीरित्या मात करू शकतात.
- डॉ. नीता वर्टी, एनएससीआय प्रमुख, वरळी कोरोना केंद्र

Edited By - Prashant Patil