एसटीतील कंत्राटी कर्मचारी दहा महिन्याच्या वेतनापासून वंचित; राज्यभरातील कामगारांवर उपासमारीची वेळ

प्रशांत कांबळे
Wednesday, 12 August 2020

राज्य परिवहन महामंडळाच्या स्वच्छता विभागात कंत्राटी काम करणाऱ्या ब्रिक्स इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर 2019 ते आजपर्यंतचे वेतनच मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील बसस्थानक, आगार आणि कार्यालयांची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचे गेल्या 10 महिन्यापासून वेतन रखडले आहे. एसटीने स्वच्छतेसाठी ब्रिक्स कंपनीला काम दिले होते. मात्र कंपनीने या कामगारांना अद्याप वेतन दिले नसल्याने ऐन कोरोना महामारीच्या काळात या सफाई कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याने या कामगारांचे वेतन तातडीने देण्याची मागणी मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाने परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

राज्य परिवहन महामंडळाच्या स्वच्छता विभागात कंत्राटी काम करणाऱ्या ब्रिक्स इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर 2019 ते आजपर्यंतचे वेतनच मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ब्रिक्स इंडिया कंपनीने एसटी महामंडळात केलेल्या स्वच्छतेच्या कामाची अद्याप पैसे मिळाले नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नसल्याचा दावा मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे केला आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे या सफाई कामगारांकडून सातत्याने वेतन देण्याची मागणी केली जात आहे.

IPL खेळण्याचं स्वप्न अधूरं! मुंबईकर क्रिकेटपटूनं संपवलं जीवन

सध्या राज्यासह जगभरात कोविड-19 च्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक श्रमिक कष्टकरी आणि कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक कोंडीमुळे कित्येकांचे रोजगारही गेले आहे. अशा परिस्थितीत स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने अदा करण्याची गरज असून एसटी महामंडळ आणि ब्रिक्स इंडिया कंपनीने मिळून सफाई कामगारांच्या वेतनाचा तोडगा काढण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन परिवहन मंत्री अनिल परब यांनाही देण्यात आले आहे.

मुंबई पालिकेच्या 'या' रुग्णालयात लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड OPD

एसटी महामंडळाने ब्रिक्स इंडिया कंपनीचे बिल अदा करावी जेणे, करून कंपनीला या कामगारांचे वेतन देता येईल, त्यासाठी परिवहन मंत्र्यांनी यावर तोडगा काढावा.
- कॉ. नरसय्या आडम, माजी आमदार तथा सिटू राज्य उपाध्यक्ष
--
एसटी महामंडळात 2017 मध्ये ब्रिक्स इंडिया कंपनीला 3 वर्षांचे हाऊसकिपिंगचे कंत्राट मिळाले होते. मात्र लॉकडाऊन पूर्वी हे काम बंद झाले आहे. दरम्यान नोव्हेंबर 2019 पासून आजपर्यंतचे राज्यातील एकाही कर्मचाऱ्याला ब्रिस्क इंडिया कंपनीने वेतन दिले नाही. राज्यात एकूण साडे तीन हजार कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- शेखर क्षीरसागर, तत्कालीन कर्मचारी, ब्रिक्स कंपनी
---
ब्रिस्क कंपनीचा एसटी महामंडळाशी असलेला करार मार्च महिन्यात संपला आहे. त्यापूर्वी ब्रिस्क कंपनीने केलेल्या कामाचे वेतन त्यांना देण्यात आले आहे. मात्र, राज्यातील अनेक विभागांमध्ये कंपनीवर काही दंड असल्याने काही ठिकाणी ब्रिस्क कंपनीचे बिल थकीत असेल त्याचे बिल कंपनीने एसटीकडे पाठवले असेल तर ते तपासून देण्यात येणार आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many msrtc contractual employees did not get salary from ten months