IPL खेळण्याचं स्वप्न अधूरं! मुंबईकर क्रिकेटपटूनं संपवलं जीवन

IPL खेळण्याचं स्वप्न अधूरं! मुंबईकर क्रिकेटपटूनं संपवलं जीवन

मुंबईः  मालाडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटमध्ये आपलं करिअर करता आलं नाही या विंवचनेतून या तरुणानं आत्महत्येचं पाऊल उचललं. मालाड पूर्वे येथे राहणारा २७ वर्षीय करण तिवारी यानं सोमवारी रात्री आपल्या घरात गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. 

तणावातून त्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. करिअरमध्ये आयपीएल आणि मोठ्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही आणि याच नैराश्यातून त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 

कोणत्याही प्रकराची सुसाईट नोट त्याच्याकडे सापडली नसून कुरार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

करण तिवारी हा मालाडमध्ये आई आणि भावासोबत राहत होता. करणने आत्महत्येपूर्वी शेवटचा कॉल राजस्थानमध्ये असलेल्या त्याच्या मित्राला केला होता असंही पोलिस तपासात समोर आलं आहे. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचं त्यानं आपल्या मित्राला फोनवर सांगितलं. यावर मित्राने लगेच त्याच्या बहिणीला फोन केला आणि याबद्दल माहिती दिली. यानंतर बहिणीने मुंबईला तिच्या आईला फोनवर घडलेला प्रकार सांगितला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आईने घाईघाईत घर उघडलं तर त्यावेळी करणने आत्महत्या केल्याचं समोर आलं. 

रात्रीच्या जेवणानंतर करण साडेदहाच्या सुमारास त्याच्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद करुन घेतला.  तो दरवाजा उघड नाही म्हणून लॉक तोडण्यात आलं. त्यावेळी करणचा मृतदेह समोर दिसला. दरम्यान पुढील तपास कुरार पोलिस करत आहेत. गळफास घेतल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

करणचा मित्र जितू वर्मानं पोलिसांना सांगितलं की, क्रिकेट खेळण्यासाठी त्याची धडपड सुरु होती. तर  मुंबई सीनिअर संघाचे प्रशिक्षक विनायक सामंत यांनी म्हटलं की, करणसाठी मी चांगला स्थानिक क्लब शोधण्याचा प्रयत्न करत होतो. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी करणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवला आहे.

ipl playing dream incomplete 27 year old cricketer found dead malad mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com