मराठा तरुणांचा चंद्रकांत पाटील यांना घेराव

टीम ई-सकाळ
Tuesday, 10 September 2019

मुंबई : राज्यात सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वगळ्याप्रकरणी मराठा समाजाच्या तरुणांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घातला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात काल (रविवार) रात्री हा प्रकार घडला होता.

मुंबई : राज्यात सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वगळ्याप्रकरणी मराठा समाजाच्या तरुणांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घातला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात काल (रविवार) रात्री हा प्रकार घडला होता.

आणखी वाचा : एमपीएससीच्या नियुक्त्यांना मुहूर्त

काय आहे प्रकरण आणि काय घडले?
राज्यातील सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत 135 विद्यार्थ्यांना वगळल्या संबंधित परीक्षार्थी संतप्त होते. राज्य शासनाच्या 2014च्या निर्णयाप्रमाणे खुल्या वर्गातील तरुणांना शिफारसपत्र देण्यात आले होते. तरीही त्यांना वगळण्यात आले. आता 2018मधील नव्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षणामधील खुल्या वर्गात राखीव प्रवर्गातील विध्यार्थ्यांना संधी मिळाल्याने 135 मराठा तरुणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे मराठा तरुण परिक्षार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

परिणामी संतप्त परीक्षार्थींनी काल, भाजप प्रदेश कार्यालयावर धडक दिली. त्यावेळी कार्यालयात असलेले प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घालण्यात आला. विद्यार्थी प्रदेश कार्यालयात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथून न हटण्याची भूमिका घेतली. यापूर्वी या विद्यार्थ्यांकडून सातत्याने राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला. पण, या पत्रांची कोणत्याही प्रकारची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पत्रं दिली होती. पण, त्यांनीही पत्रांची दखल घेतली नाही. चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha protest outside bjp pradesh office mumbai chandrakant patil