Maratha Reservation : राज्यातील सुमारे 30 लाख मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी - आमदार संजय गायकवाड

राज्यातील किमान ३० लाख लोकांचा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले.
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay Gaikwadsakal

बुलडाणा - ज्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली त्यांच्या विचारांचा मंत्री छगन भुजबळ यांना विसर पडला असून, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी समिती नेमल्यानंतर ३० लाखाच्या वर नोंदी सापडल्या त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे किमान राज्यातील ३० लाख लोकांचा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले.

हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आयोजित चर्चेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांना केंद्राची युपीएससी सवलत लागू व्हायलाच पाहिजे त्यांना आयएएस आयपीएस होत आलं पाहिजे असे ते म्हणाले.

सभागृहामध्ये बोलताना बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी मराठा समाजाची सद्यस्थितीतील संपूर्ण परिस्थिती सभागृहासमोर मांडली. तसेच मराठा आणि कुणबी हे वेगळे नसून एकच आहेत, असे देखील सांगितले...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com