
Sambhaji Brigade on Maratha Reservation
Esakal
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी योग्य असून सरकारने काढलेला जीआर हा गुंतागुंतीचा आणि कोर्टात न टिकणारा असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. राज्यातला जातीय तणाव दूर करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी राज्यभरात 'महाराष्ट्र धर्म' सभा घेणार असल्याचं संभाजी ब्रिगेडने सांगितलं.