Maratha Reservation : ''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर'', आमदाराच्या घरावरील हल्ल्यानंतर सुळे संतापल्या...

Maratha Reservation : ''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर'', आमदाराच्या घरावरील हल्ल्यानंतर सुळे संतापल्या...
Updated on

मुंबईः बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर सोमवारी हल्ला झाला. 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत आंदोलकांनी त्यांच्या घरालादेखील आग लावली. राज्यामध्ये मराठा आंदोलन उग्र रुप धरण्याच्या मार्गावर आहे.

प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांना हे झेपत नाहीये. आमदाराच्या घरावर झालेला हल्ला हे सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे.

Maratha Reservation : ''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर'', आमदाराच्या घरावरील हल्ल्यानंतर सुळे संतापल्या...
Lalit Patil : ललित पाटील 'ड्रग्ज'प्रकरणी ससून रुग्णालयातील एका अधिकाऱ्याचा राजीनामा

सुळे पुढे बोलल्या की, माजलगावमध्ये आमदारांच्या घरात लोकं शिरली, महाराष्ट्राला पॉलिसी पॅरॅलीसीस झाला आहे का? राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मराठा आरक्षण प्रकरणात 40 दिवस सरकार काय करत होते? ट्रिपल इंजिन सरकारने ४० दिवसांमध्ये काय केले? कशाच्या आधारावर सरकारने ४० दिवसांचा वेळ मागितला होता? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

Maratha Reservation : ''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर'', आमदाराच्या घरावरील हल्ल्यानंतर सुळे संतापल्या...
मंत्री, आमदार-खासदारांना बाहेर पडणे मुश्किल! घर- कार्यालयाला पोलिसांचा बंदोबस्त; शिक्षक आमदार म्हात्रे यांची बैठक उधळली

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सोमवारचा सहावा दिवस आहे. समाजाच्या आग्रहाखातर जरांगेंनी पाच घोट पाणी घेतलं. ते म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवत असल्याचं सांगितलं आहे. सरकारने सरसकट आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, असं जरांगेंनी अधोरेखित केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com