

sakal
कऱ्हाड : मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा सदस्य म्हणून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवादात आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे. मराठा आरक्षण शब्दापासून सरकार मागे हटलेले नाही. सरकारची चर्चेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे, अशी विनंती पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे केली.