

Konkani Mohalla in Karachi A Living Cultural Heritage
Esakal
पाकिस्तानच्या कराची शहरात महाराष्ट्रातल्या रत्नागिरीतून गेलेले कोकणी लोक एका मोहल्ल्यात राहतात. आजही त्यांनी त्यांची कोकणी भाषा, संस्कृती जपलीय. कराचीतील बाल्डिया शहरात ही कोकणी कम्युनिटी राहते. रत्नागिरीतून १९४७ मध्ये त्यांनी स्थलांतर केलंय. महाराष्ट्रातल्या रत्नागिरीतून भरूच मार्गे ते इथपर्यंत पोहोचलेत. आजही कराचीत राहणाऱ्या या लोकांना कोकणचा अभिमान वाटतो. कोकणची ओळख, जेवणाची चव, पूर्वजांची कोकणी भाषा त्यांनी जपली आहे.