esakal | महाजनांचे फर्दापूर 'रेस्ट हाऊस' चे किस्से जगजाहीर !

बोलून बातमी शोधा

eknath khadse-girish mahajan
महाजनांचे फर्दापूर 'रेस्ट हाऊस' चे किस्से जगजाहीर !
sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे शाब्दिक युद्ध जोरदार सुरू आहे. खडसे यांनी पुन्हा महाजन यांच्यावर वार केले असून सन 1994 पासूनचे 'फर्दापूर रेस्ट' हाऊस वरील महाजन यांचे किस्से जगजाहीर आहेत असा खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा: "खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका

भाजप नेते गिरीश महाजन हे पश्चिम बंगाल येथे भाजप उमेदवारांचा प्रचार करून जळगावात परतले, त्यानंतर ते नाशिक येथे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व महाजन यांचे शाब्दिक युद्ध जोरदार सुरू आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केल्याची क्लिप नुकतीच व्हायरल झाली. त्याला नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी उत्तर दिले, खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी ठणठणीत...

खडसे यांनी ही महाजन यांना तेवढ्याच तडफेने उत्तर दिले, ते म्हणाले, मी ठणठणीत आहे, ज्यांना शंका असेल त्यांनी आपणास प्रत्यक्ष येऊन भेटावे. जामनेर तालुक्यात कोरोनाने रोज 25 ते 30 लोक मृत्यू पावत आहेत. त्यातच त्या ठिकाणी पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. मला तालुक्यातून रोज नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्याची ही परिस्थिती असतांना आमदाराने तालुक्यात राहणे गरजेचे आहे. मात्र महाजन इकडे तिकडे फिरत असतात त्यामुळे आपण साहजिकच फोनवर खानदेशी भाषेत बोलोलो तुमचा आमदार कुठे फिरतोय, त्यात एवढे वेगळे काय होते.

हेही वाचा: कोरोनाने कुंकू पुसलं..आणि जीवनच रुसलं; एकाच कुटुंबार आली वेळ

आजही आमदारकीचा रुबाब आहे

आमदार गिरीश महाजन यांचे 1994 पासूनचे फर्दापूर रेस्ट हाऊस वरील किस्से जगजाहीर आहेत. त्यांनी मला आमदारकी मिळाली नाही, म्हणून मानसिक संतुलन बिघडले असल्याचे म्हटले आहे. मात्र मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतोच त्यामुळे मला आमदारकीचे काहीही वाटत नाही, आजही आपला आमदारकीचा रुबाब आहेच.

संपादन- भूषण श्रीखंडे