esakal | महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली!
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली!

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली!

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः भाजपचे (bjp) सरकार होते तेव्हा आम्ही तांत्रिक दृष्टा मुद्दावरून मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation) आम्ही केले आणि पुढे न्यालयात (Maratha reservation case) सक्षमपणे मांडलेले होते. पण दुदैवाने आमचे सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे हे सरकार आले पण यांच्यात कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्यानेच मराठा समाजाचे हे आरक्षण हुकले आहे. असे भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. (community reservation discrepancies state government girish mahajan statement)

हेही वाचा: मंत्री गुलाबराव पाटील..स्वःताची पाठ थोपटून घेतायं !

भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन हे बुधवारी दुपारी जळगावात आलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आले असतांना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावर पुढे बोलतांना श्री. महाजन म्हणाले, की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतांना विधानसभेत कायदा केला. आयोग नेमला दुर्दवाने सरकार बदले आम्ही तांत्रिक मुद्यावर हे आरक्षण टिकवून ठेवले होते. महाविकास आघाडी सरकारच्या (Government of Maharashtra) नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने होती. कोणालाय काय करावे हे माहीत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटत असल्याचे दिसून येत होते.

हेही वाचा: ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीमुळे खरेदी-विक्री नोंदणी व्यवहारात घट !

पुढे काय करावे हे सरकारने ठरवावे

मराठा आरक्षण बाबत आम्ही सरकार सोबत आहो, पण पुढे काय करायचे हे सरकारने ठरावचे आहे. पण महाविकास आघाडीचे सरकारने विरोधीपक्षाला विश्वासतच घेतले नाही यामुळे हे मराठा आरक्षण आज रद्द झाले आहे. कोरोना आजाराशी लढा पासून ते मराठा आरक्षण पर्यंतची सर्व लढाई आम्हीच लढू असे आडमुठ धोरण महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आहे.

(community reservation discrepancies state government girish mahajan statement)