'महाराष्ट्र बंद'नंतर आज दिवसभरात...

Mumbai_Band
Mumbai_Band

मुंबई - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ डाव्या आणि दलित संघटनांच्या आवाहनानुसार राजधानी मुंबईसह राज्यभर बंद पाळण्यात आला. नाकाबंदी, तोडफोड, तसेच ‘रास्ता’ आणि ‘रेल्वे रोको’मुळे राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले. 

                               दिवसभरातील पडसाद                                             

भिडे,एकबोटेंना अजूनही अटक का नाही?- प्रकाश आंबेडकर
मुंबई- कालचा 'महाराष्ट्र बंद' कुठल्याही एक समाज, संघटनेपुरता मर्यादीत नव्हता. हे आंदोलन फक्त दलितांचे नव्हते तर जे बारा बलुतेदार होते त्यांचा ही सहभाग होता आणि सरकारने हे मान्य केलं आहे असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज(गुरुवार) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
-------------------
मग यावर्षीच का हे घडले : शरद पवार
नवी दिल्ली - कोरेगाव भीमा येथे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक जात आहेत. मग, यावर्षीच याठिकाणी दंगल का घडली. गेल्या महिन्याभरापासून सांप्रदायिक संघटना येथील नागरिकांना भडकाविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
--------------------
छात्रभारतीचे विद्यार्थी जुहू पोलिस ठाण्यातून अज्ञात स्थळी
कोरेगाव भीमा प्रकरण आणि महाराष्ट्र बंदनंतर आज (गुरुवार) छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय छात्र संमेलन या जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील आणि छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. पण आता त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचे कळते.
--------------------
जगातील सर्वोत्तम अभिनेता नरेंद्र मोदी - जिग्नेश मेवानी
नवी दिल्ली - जिग्नेश मेवानी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित समाजासाठी बनावट समर्थन देत आहेत, असा आरोप केला आहे. 21 व्या शतकात जगातील सर्वोत्तम अभिनेता भारतातून असेल, असे फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्राडेमस यांनी म्हटले होते. हा अंदाज खरा ठरला असे म्हणत मेवानी यांनी हा सर्वोत्तम अभिनेता पंतप्रधान मोदी असल्याचे वक्तव्य केले आहे. 
------------------
‘बंद’काळात पोलिस दलाचे कसब पणाला
जळगाव - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाने मंगळवारी रात्रीपासून चालवलेले प्रयत्न, आंबेडकरी जनतेशी समन्वय आणि जळगावकरांच्या संयमाने किरकोळ घटना वगळता ‘बंद’ तणावपूर्ण शांततेत पार पडला. गोलाणी मार्केटमध्ये महिला कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा, दुपारी गणेश कॉलनीत दंतचिकित्सकाच्या दवाखान्यावर झालेल्या दगडफेकीने शांततेला थोडे गालबोट लागले.
------------------
पंढरपूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद
पंढरपूर: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आज (गुरुवार) येथील विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु, तरीही काही समाजकंटकांनी काही दुकानांवर दगडफेक करुन काचा फोडल्या. त्यामुळे थोडा वेळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com