शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आणू नका !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

शेतकऱ्यांना इतके सगळे मित्र लाभल्याचे हे चित्र सुखावणारे असेल, तर शेतकऱ्यांना दर चार-सहा महिन्यांनी छोट्या-मोठ्या मुद्‌द्यावर रस्त्यावर का उतरावे लागते? हजारो शेतकऱ्यांना नाशिक ते मुंबई ही दोनशे किलोमीटरची पायपीट का करावी लागली? पाय रक्‍तबंबाळ होईपर्यंत वाट तुडवणारा हजारो दुबळ्यांचा समूह काय मंत्रालय पाहायला आला होता का?

किसान ‘लाँग मार्च’च्या रूपाने मुंबईत धडकलेल्या लाल वादळाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये अहमहमिका लागली. सत्तेत सहभागी शिवसेना, तसेच विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, भारिप-बहुजन महासंघ अशा सगळ्या छोट्या-मोठ्या पक्षांनी ते शेतकऱ्यांसोबत असल्याचे जाहीर केले. नेत्यांनी आझाद मैदानावर तयार गर्दीसमोर भाषणे करून सरकारवर टीकेची आणखी एक संधी साधली. सोमवारी सकाळी आंदोलकांशी चर्चा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री, तसेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेतेही आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगू लागले.

शेतकऱ्यांना इतके सगळे मित्र लाभल्याचे हे चित्र सुखावणारे असेल, तर शेतकऱ्यांना दर चार-सहा महिन्यांनी छोट्या-मोठ्या मुद्‌द्यावर रस्त्यावर का उतरावे लागते? हजारो शेतकऱ्यांना नाशिक ते मुंबई ही दोनशे किलोमीटरची पायपीट का करावी लागली? पाय रक्‍तबंबाळ होईपर्यंत वाट तुडवणारा हजारो दुबळ्यांचा समूह काय मंत्रालय पाहायला आला होता का? हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या का घडताहेत? सगळ्या राजकीय पक्षांमधील शेतकऱ्यांचे मित्र शेती व शेतकऱ्यांबाबत मूलभूत चिंतनासाठी, मंथनासाठी एकत्र का येत नाहीत? यापुढील काळात अन्नदात्याला रस्त्यावर येण्याची वेळ आणू नका. 

तुम्ही हे वाचलं का?

केडरबेस लढा

होय, इथे माणुसकी अजून जिवंत आहे..!

शेतकरी मोर्चातून नक्षलवाद डोकावतोय - पूनम महाजन

Web Title: Marathi News Maharashtra News Farmer Long March Government