
Matheran Closed: उन्हाता तडाखा वाढला आहे. थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी माथेरानला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तो आत्ताच कॅन्सल करा कारण आजपासून (मंगळवार) शहरात बेमुदत संप पाळण्यात येणार आहे. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून हा बंद पाळला जाणार आहे. पर्यटकांची होणारी लुबाडणूक रोखण्यास प्रशासन कानाडोळा करत असल्यानेच संघर्ष समितीने हा आवाज दिला असून त्याला हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, सामाजिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे असे समितीकडून सांगण्यात आले आहे.