...जेव्हा नवनीत राणांना गावकरी पितात तेच पाणी प्यायला दिलं

...जेव्हा नवनीत राणांना गावकरी पितात तेच पाणी प्यायला दिलं

अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरात पाच डोंगरी ,कोयलारी,कटकुंभ,आणि चूरणी या गावात उघड्या विहिरीतलं दूषित पाणी प्यायल्याने २३१ जणांना अतिसाराची लागण झाली असून या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, खासदार नवनित राणा यांनी घटनास्थळी जात तेथिल परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, गावकरी पितात तेच पाणी त्यांना प्यायला दिले तेव्हा त्या संतापल्या. असा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Melghat due to contaminated water Navneet Rana Hanuman Chalisa)

बाधित नागरिकांना दुषित पाण्यामुळं कॉलराची लागण झाली आहे. त्यामुळं सर्व बाधितांची वैयक्तिक तपासणी करुन उपचार केले जात आहे.

अशातच राणा यांनी घटनास्थळी भेट दिली. दुषित विहीर पाहून त्यांनी नागरिकांना तुम्ही कधी फोन नाही केला की अशी समस्या आहे? असा सवाल उपस्थित केला. तेव्हा हे गाव वसल्यापासून येथिल नागरिक हेच पाणी पित आहेत. पण सरकारने लक्ष दिलेलं नाही. यावेळी त्यांनी इतर माहिती घेतली. सरपंच फोन उचलत नाही अशी तक्रार गावकऱ्यांनी राणा यांना केली. यावेळी राणा यांनी गावाचा सरपंच बदलण्याचे वक्तव्य केल. दरम्यान, एका सामाजिक कार्यकर्त्यांने राणा यांनी दुषित विहिरीतले पाणी राणा यांना पिण्यास दिले. त्यावेळी त्या संतापल्या.

सामाजीक कार्यकर्त्यांनी राणा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. जेव्हा राणा यांना विहिरतले पाणी प्यायला दिले तेव्हा त्यांनी नकार दिला. ते काय फक्त हनुमान चालिसा वाचण्यासाठीच आहेत का? हनुमान चालिसा वाचून कोणत्या समस्या सुटत नाहीत असे ठणकावून सांगत जमिनीवर येऊन काम करा असा सल्ला गावकऱ्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शासकीय खर्चातून जखमींवर उपचार केले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com