

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता अखेर पावसाने परतीची वाट धरली आहे. यामुळे आता राज्यभरात गार वारे वाहत असून हवामान विभागाने महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. आजपासून म्हणजेच शनिवार (ता. १५) काही जिल्ह्यांमध्ये गारठा वाढणार असल्याची चिन्हं आहेत.