म्हाडा परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर

म्हाडाच्या परीक्षा अनेकवेळा पुढे ढकलण्यात आल्या.
Mhada
Mhada Sakal

म्हाडा परीक्षेचे वेळापत्रत (MHADA Exam Time Table) जाहीर झालं आहे. ७, ८ आणि ९ फेब्रुवारीला या परीक्षा होणार असल्याचं म्हाडाने जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना याबद्दलच्या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मिळतील. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Mhada Exam Date)

Mhada
राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट
MHADA Exam Time Table
MHADA Exam Time TableTeam eSakal

म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्याने म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता नवीन वेळापत्रकानुसार ७,८, आणि ९ फेब्रुवारीला सकाळी ९ ते ११ दुपारी १२:२० ते २:३० आणि ४ ते ६ अशा वेळेत या तीन दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता विद्याथ्यांना पुन्हा एकदा या परीक्षांसाठी तयारी करावी लागणार आहे.

Mhada
मुंबई: रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट, भाजपा नेता ताब्यात

राज्यातील पेपरफुटी प्रकरणानंतर सर्वच प्रकारच्या परीक्षांच्या नियोजनात मोठा घोळ झाला होता. आरोग्य विभागाच्या, म्हाडाच्या आणि टीईटी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लीक होणे, गुप्तता भंग होणे यांसारख्या गोष्टींमुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये पेपर फोडणारी राज्यातील एक मोठी टोळी समोर आली होती. या प्रकरणात अनेक मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागले.

Mhada
TET परीक्षेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार! आयुक्त सुपेंनी लाटले 1.70 कोटी

टीईटी परीक्षेत (TET Exam) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचं समोर येतं आहे.या प्रकरणात पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली असून, यात परीक्षा परीषदेच्या, तुकाराम सुपे, सुखदेव ढेरे ,सल्लागार आश्विन कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रं देणे असे आरोप आहेत. या प्रकरणात वेगवेगळ्या परीक्षांच्या तब्बल ५०० उमेदवारांचे निकाल बदलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तसंच या प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपे यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचं घबाड पोलिसांनी जप्त केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com