MHT CET परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; असा पाहा निकाल

MHT-CET Exam
MHT-CET Examsakal media

मुंबई: इंजिनिअरिंग सीईटीचा निकाल आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. आज संध्याकाळी सातनंतर हा निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

MHT-CET Exam
समीर वानखेडेंच्या वडिलांचं स्पष्टीकरण; "निकाहनामा खरा! मात्र..."

MHT CET परीक्षेचा (एमएचटी सीईटी) निकाल आज जाहीर होणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या दोन गटांसाठी एमएचटी सीईटी 2021 आणि जीवशास्त्र (PCB) -- 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली होती. तसेच अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती.

असा पाहा निकाल

  • MHT CET च्या अधिकृत वेबसाईटवर जा.

  • cetcell.mahacet.org ही त्या वेबसाईटची लिंक आहे.

  • त्यावर रिझल्ट सेक्शनमध्ये जाऊन MHT CET result वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारिख टाकून निकाल पाहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com