समीर वानखेडेंच्या वडिलांचं स्पष्टीकरण; "निकाहनामा खरा! मात्र..."

समीर वानखेडेंच्या वडिलांचं स्पष्टीकरण; "निकाहनामा खरा! मात्र..."

मुंबई : समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आता पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलंय की, निकाह नामा खराच आहे पण त्यावर माझा दाऊद नाव चुकीचं आहे. माझ्या बायकोने ते चुकून केलं असावं, तीने असं का केलं हे सांगायला आता या जगात ती नाहीये. मी जन्मापासून हिंदूच आहे. ती प्रेमाने मला दाऊद म्हणाली असेल. अशा पद्धतीने तिने मला म्हटलं असेल. मी जन्मापासून हिंदू असताना माझा मुलगा मुस्लिम कसा होऊ शकतो? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

समीर वानखेडेंच्या वडिलांचं स्पष्टीकरण; "निकाहनामा खरा! मात्र..."
जलयुक्त शिवारला क्लीन चीट मिळाल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पुढे ते म्हणाले की, ज्ञानदेव कचरु वानखेडे हेच माझं खरं नाव आहे. माझ्या सगळ्या कागदपत्रांवर ते आहे. मी हिंदू SC आहे. मी मुस्लिम नाहीये. मुस्लिम असलेल्या बायकोने कदाचित निकाहनाम्यावर दाऊद लिहलं असेल, मला माहिती नाही. मला उर्दू लिहता वाचता येत नाही. तिने लिहलं असावं मात्र, सगळ्या सरकारी कागदपत्रांवर मी हिंदूच आहे. दाऊद नसून माझं नाव ज्ञानदेवचं आहे.

नवाब मलिकांविरोधात कोर्टात जाणार

पुढे त्यांनी आपण नवाब मलिकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. त्यांच्यामुळे मानसिक त्रास झाला असून त्यांनी अनेक खोटे आरोप माझ्या कुटुंबियांविरोधात केले आहेत. आपण त्यांच्याविरोधात ऍट्रोसिटी तसेच बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ड्रग्ज प्रकरणाचा संबंध माझ्या जाती-धर्माशी कसा येऊ शकतो? सार्वजनिक रित्या असं एखाद्याचा जात-धर्म काढून बदनामी करणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com