मंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा धमकीचे पत्र; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

धमक्यांच सुत्र सुरु असून आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून एक धमकीचे पत्र आले आहे
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेgoogle
Summary

धमक्यांच सुत्र सुरु असून आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून एक धमकीचे पत्र आले आहे

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांची दखल घेत शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिलिंद तेलतुंबडेसह कुख्यात नक्षलवाद्यांना पोलिसांनी चकमकीत मारल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातून शिंदे यांना धमकी येत आहेत अशी माहिती मिळाली होती. दरम्यान, हे धमक्यांच सुत्र सुरु असून आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून एक धमकीचे पत्र (Threat Letter) आले आहे. गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना (Naxalism) मारल्याचा बदला घेण्यात येईल, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे सुत्र सुरुच आहे. शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक पत्र मिळाले. त्यात नक्षलवाद्यांनी बदला घेण्यात येईल, असा उल्लेख केला आहे. या घटनेनंतर मात्र शिंदे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

एकनाथ शिंदे
'शिव-शाहूंचा परंपरा असलेल्या कुणीतरी मराठा आरक्षणासाठी पुढं यावं लागेल'

दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २५ नक्षलवादी मारले गेले होते. त्यात एका कमांडरचाही समावेश होता. अधिकाऱ्याने सांगितले की, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. मुंबईत मंत्रालयात झालेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यादरम्यान नगरविकास मंत्री शिंदे यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेले होते.

काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे

यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या अनेकवेळा मिळाल्या आहेत. गडचिरोलीचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा उद्देश आहे. गडचिरोलीत नक्षलवादाच्या समस्येचा निपटारा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विकास करणे हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे
EDचं मोठं ऑपरेशन; 'हसीना पारकर'च्या घरावर छापा, एक जण ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com