स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हात-पाय बघत नाही; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हात-पाय बघत नाही; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून बंड केल्यानंतर चर्चेत आलेले आणि आता नव्या सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. (Gulabrao Patil News in Marathi)

हेही वाचा: ठाकरेंच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न..

मंत्री पाटील म्हणाले की, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ. स्त्री रोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही. हात-पाय बघणारा कधीच स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही. आम्ही जनरल फिजीशियन आहोत. आमच्याकडे ज्याची बायको नांदत नाही, तो पण येतो. आमचं एकटं डोक असतो. डॉक्टरांचं एकाच फॅकल्टीचं डोक असतं. आमच्याकडे वेगळवेगळ्या समस्या असतात. आम्ही समजून घेऊन काम करत असतो, असंही पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा: गबरू जवान! मोहित कंबोज यांचे नाव न घेता रोहित पवारांवर धक्कादायक आरोप

गुलाबराव पाटील हे आपल्या दमदार भाषणांसाठी ओळखले जातात. मात्र आज जाहीर कार्यक्रमात त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरवर विधान केलं. त्यामुळे यावर आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Minister Gulabrao Patil Statement On Gynecologist

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..