गबरू जवान! मोहित कंबोज यांचे नाव न घेता रोहित पवारांवर धक्कादायक आरोप

Rohit Pawar and Mohit Kamboj
Rohit Pawar and Mohit Kamboj

मुंबई - ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे देखील आल्याचं दिसून येत आहे. रोहित पवार कधीकाळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून नाव न घेता रोहित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. (Rahit Pawar and Mohit Kamboj news in Marathi)

Rohit Pawar and Mohit Kamboj
महाविकास आघाडीत इच्छा नसतानाही काही निर्णय घ्यावे लागले; देसाईंचा नेमका निशाणा कोणावर?

कंबोज ट्विटमध्ये म्हणाले की, ग्रीन एकर्स कंपनीचे २०० वेगवेगळे स्टार्ट अप्स करणाऱ्या ‘गबरू जवान’चा गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड झाला आहे. प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, दारू पासून ते चड्डी विकण्याचा धंदा करणाऱ्या ग्रीन एकर्स रिसॅार्टचा अभ्यास सुरू आहे. गबरू जवानच्या या बिझनेस मॅाडेलमध्ये २००७ ते २०१२ पर्यंत महाराष्ट्र स्टेट कोॲापरेटीव्ह बॅंकेला एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

याच बॅंकेने एका साखर कारखान्याला कोट्यवधी रुपये कर्ज दिले. त्यानंतर ५० कोटी रूपयांना कारखाना कार्टेल बनवत बारामती ॲग्रोने विकत घेतला. याच कारखान्यानं परत १५० कोटी रूपयांच कर्ज घेतल. HDIL, PMC आणि पत्राचाळ घोटाळ्यात गबरू जवानाने किती साखर खाल्ली आहे हे ही लवकरच कळेल, असा इशारा कंबोज यांनी दिला आहे.

Rohit Pawar and Mohit Kamboj
कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच; जयंत पाटलांनी केले भाकित

काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. २००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार यांनी ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह चार लोकांची नावं होती. लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे आहेत. यापैकी लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते. ग्रीन एकर्स प्रा.लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली, तसेच देशात आली, याची चौकशी व्हावी, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com