Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप; 'एसीबी'नेच माहिती लीक केल्याचा तक्रारदाराला संशय

Sanjay Shirsat 5 Crore Bribe Allegation Sanjay Raut Narsingh Udgirkar ACB: ''गरीबांच्या कामासाठी मंत्री थेट पैसे मागत असतील तर राज्याचं दुर्दैव आहे.'' अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.
Sanjay Shirsat

Sanjay Shirsat

esakal

Updated on: 

Sanjay Raut Narsingh Udgirkar ACB

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मातंग समाजासाठीच्या ट्रेनिंग सेंटरसाठी पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप लातूरच्या उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी केला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आरोप केले.

संजय राऊत म्हणाले की, भरोश्याच्या म्हशीला टोणगा व्हावा, तसा कारभार मुख्यमंत्र्यांचा सुरु आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं प्रशासनावर आणि मंत्र्यांवर कोणतंही नियंत्रण नाही. भ्रष्टाचारात महाराष्ट्र हे देशात नंबर एकचं राज्य झालं आहे. लातूरचे सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर काल मला संभाजीमध्ये आल्यानंतर भेटले. ते मातंग समाजाचे नेते आहेत. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लातूरमध्ये ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. साधारण २५ कोटी रुपयांचं हे ट्रेनिंग सेंटर आहे.

Sanjay Shirsat
Vaibhav Sooryavanshi Next Match : वैभव सूर्यवंशीचा पुढील सामना केव्हा? भारतासमोर Asia Cup च्या उपांत्य फेरीत श्रीलंकेचे आव्हान; मॅच Live कुठे पाहता येणार?
Loading content, please wait...