'बत्ताशावरील कुस्ती जिंकून नारायण राणेंचा हिंदकेसरी जिंकल्याचा आव'

कोकणातील व सिंधुदूर्गची शिवसेना काय आहे, हे तेथील शिवसैनिक व जनताच दाखवून देईल, असं प्रतिउत्तर त्यांनी केलं.
Shambhuraj Desai vs Narayan Rane
Shambhuraj Desai vs Narayan Raneesakal
Summary

'170 आमदार पाठीशी असताना पुढील तीन वर्ष राज्य सरकार हलणार नाही.'

सातारा : नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंद केसरी पैलवानाशी (Hind Kesari Wrestler) लढत दिल्याचं सांगायचं हे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं केविलवाणं वक्तव्य आहे. नारळावरील कुस्ती मारून राणे हिंद केसरी पैलवानाशी बरोबरी केल्याचा आव आणत आहेत, अशी सडेतोड टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली. राज्यात महाविकास आघाडीला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. सरकारच्या कामावर राज्यातील जनता समाधानी आहे. महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) पडणार असे विरोधक नैराश्‍यातून बोलत असून, १७० आमदार पाठीशी असताना पुढील तीन वर्ष राज्य सरकार हलणार नसल्याचं सांगून मंत्री देसाईंनी भाजपवर (BJP) पलटवार केला.

Shambhuraj Desai vs Narayan Rane
'शेलारानू.. अर्ध्या हळकुंडानं पिवळं कित्याक व्हतास?'

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यात व जिल्ह्यात राबविलेल्या महत्वाच्या योजना व निर्णयांची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणेंनी वाघाच्या शेपटाला पकडलंय आणि त्याला सिंधुदूर्ग जिल्हा बँकेत (Sindhudurg District Bank Election) जाण्यापासून रोखतात, असं कार्टुन प्रसिध्द झालं आहे. याविषयी मंत्री देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, गावाकडे नारळावरील किंवा बत्ताशावरील कुस्ती असते. त्याप्रमाणे नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरीला लढत दिली असं सांगायचं हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं केविलवाणं वक्तव्य आहे. बत्ताशा व नाराळावरील कुस्ती मारून ते जर हिंद केसरी पैलवानाशी बरोबरी केल्याचा आव आणत आहेत. मुळात जिल्हा बँकेची निवडणूक ही मर्यादीत मतदारांची असते. त्यांनी जनरल निवडणुकीसाठी पुढं यावं, त्यांना कोकणातील व सिंधुदूर्गची शिवसेना काय आहे, हे तेथील शिवसैनिक व जनताच दाखवून देईल, असं प्रतिउत्तर त्यांनी केलं.

Shambhuraj Desai vs Narayan Rane
सगळ्यांना पुरुन उरलोय अन् केंद्रापर्यंत पोचलोय : नारायण राणे

देसाई पुढे म्हणाले, राज्यात गृहविभागांतर्गत नोकरभरती होणार असून, आरोग्य खात्यातील बारा हजार पदे भरण्याचा निर्णय झाला आहे. त्यामधील सद्यःस्थितीत पाच हजार पदे भरण्याचाही प्रक्रिया सुरू झाली आहे. याचबरोबर कोरोनाच्या संकटात पोलिसांनी जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली. या काळात राज्यात मृत्यू झालेल्या ३९० कर्मचाऱ्यांना ५० लाख सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. राज्य सरकार सत्तेत आल्यापासून दोन वर्षांत पोलिस खात्यासाठी बाराशे कोटींची तरतूद केली आहे. राज्यात कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापन करणार आहे.’’ जिल्ह्यात राबविलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून ७२१ गावांत समुपदेशन करण्यात आले असून, शाळांमध्ये ऑनलाइन ट्रेनिंगही देण्यात आले आहे. याचबरोबर राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पाटण तालुक्यात दोन वर्षांत ४२९ कोटींची कामे प्रत्यक्षात झाली असून, मल्हारपेठ व मसूर या ठिकाणी नवीन पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Shambhuraj Desai vs Narayan Rane
007.. नाम तो सुना होगा! उदयनराजेंच्या ताफ्यात किती गाड्या आहेत माहितीय?

कोविडच्या काळात राज्याच्या तिजोरीत एक हजार कोटी महसूल कमी आला असून, त्याचा विकासावर परिणाम झाला आहे, तरीही जिल्हा नियोजन समितीच्या निधीत वाढ करून २०२०-२१ मध्ये ३२५ कोटी, तर २०२१-२२ मध्ये ३७५ कोटी करण्यात आला. सातारा सैनिक स्कूलच्या (Satara Sainik School) अंतर्गत विकासासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव असून, चालू वर्षात १०० कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एका लहान मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. यावर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असून, मनोधैर्य योजनेतून या कुटुंबीयांना दहा लाख रुपये देणार आहे. यासाठीच प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे देसाई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com