
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयानं कॉमेडियन कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. ७ एप्रिलपर्यंत कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं असून तो ३१ मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार आहे. आता या प्रकरणी राज्याचे पर्यटन व खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते शनिवारी साताऱ्यातील कराड इथं बोलत होते.