Ajit Pawar: 'मंत्रिपदे केवळ मिरविण्यासाठी नाहीत', अजित पवारांकडून लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची कानउघाडणी

अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत
ajit pawar
ajit pawar sakal
Updated on

"मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी पॅकेज जाहीर होईल. त्यातील कामे करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. आठवड्याला बैठका घ्याव्यात. बैठकांमुळेच कामे मार्गी लागतात. मंत्रिपदे काही मिरविण्यासाठी नाहीत. प्रत्येकाने रात्री झोपताना आज दिवसभर आपल्या पदाचा जनतेला काय उपयोग झाला? याचा विचार केला पाहिजे," असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सुनावले.(Latest Marathi News)

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी वंदे मातरम् सभागृहात घेण्यात आला. या वेळी पवार बोलत होते.

"मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्षाची ही सांगता असली तरी हा शेवट नसून शताब्दी वर्षाकडे जाणाऱ्या विकसित मराठवाड्याची ही सुरुवात असल्याचेही त्यांनी सांगितले. यानिमित्त होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयांमुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल."(Latest Marathi News)

ajit pawar
New Parliament: नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा ; उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण

"यानिमित्त होणाऱ्या निर्णयांची प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने कामे करून मार्गी लावावीत. गुजरातकडे जाणारे अतिरिक्त पाणी राज्यासह गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवून येत्या काळात मराठवाड्यात याचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे."(Latest Marathi News)

"येत्या काळात असे १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सुमारे दीड लाख पदे भरली जात आहेत," असेही त्यांनी सांगितले.

ajit pawar
Sadabhau Khot : 'राष्ट्रवादीच्या बैलाला शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा...'; उस निर्यात बंदीवरून खोतांचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com