
काही बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंवर होणारी टीका सहन करणार नसल्याचा इशाराच भाजपला दिलाय.
उद्धव ठाकरेंना आजूबाजूच्या लोकांनी घेरलंय; बच्चू कडूंचा नेमका निशाणा कोणावर?
Maharashtra Politics : शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोरांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्तांतर घडवलं. पण, भाजपमधील नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू लागल्यानं काही बंडखोर व्यथित झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर श्रद्धा असल्याचं स्पष्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर होणारी टीका सहन करणार नसल्याचा थेट इशाराच भाजपला दिलाय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे आणि आता शिंदे गटात सहभागी असलेले आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडूंनी आपण सूरतला (Surat) शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गेलो नसून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात समेट होऊ शकेल का? हे पाहण्यासाठी गेलो होतो, असा खुलासा त्यांनी केलाय. मुंबईहून सुरतला जाण्याआधी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. पण, त्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग, मला वाटलं की शिंदे आणि ठाकरेंमध्ये समन्वय साधता येईल का? त्यासाठी आम्ही सूरतला गेलो. पण, तोपर्यंत तिथं आमदारांची संख्या २९-३० पर्यंत गेली होती. तेव्हा लक्षात आलं की तिथं कुणाची समेटाची मानसिकता नव्हती, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: शपथविधी पार पडताच चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंना भरवला पेढा
एकनाथ शिंदेंच्या माध्यमातूनच आपण उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता, अशी आठवण यावेळी बच्चू कडूंनी सांगितली. आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, तेव्हा शिंदेंच्या मार्फतच गेलो होतो. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी शब्दही पाळला. उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही. त्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे. पण, आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय, अशी खंतही बच्चू कडूंनी व्यक्त केलीय.
हेही वाचा: योगींचा विरोधकांना धक्का; द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा
Web Title: Mla Bachchu Kadu Praised Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..