आमदार भारत भालकेंनी 'म्हणून' थोपटले होते दंड; 25 वर्षापूर्वीच्या अपमानाचा राजकीय वचपा 

MLA Bharat Bhalke political Revenge the insult of 25 years ago
MLA Bharat Bhalke political Revenge the insult of 25 years ago

पंढरपूर (सोलापूर) : गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांनी हॅट्रीक करत भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचा दणदणीत पराभव केला. त्यावेळी भालके यांची पंढरपूर शहरातून भव्य विजयी मिरवणूकही काढली होती. मिरवणूक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. त्यावेळी आमदार भालकेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्याच वेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर दंड थोपटून 25 वर्षापूर्वीच्या अपमानाचा राजकीय वचपा काढल्याचे सुचित केले होते. पराभूत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात आमदार भालकेंनी थोपडलेल्या दंडाची त्यावेळी राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. मी त्यावेळी दंड का थोपटले होते. याचा आज आमदार भालके यांनी सकाळशी बोलताना उलगडा केला. 25 वर्षापूर्वी घडलेला राजकीय घटनाक्रम यानिमित्ताने उलगला. 
आमदार भालके म्हणाले, पंढरपूरच्या राजकारणाला मोठा इतिहास आहे. महाष्ट्राच्या विधानसभेत पंढरपूरचे प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य लाभणे म्हणजे, त्या नेत्याचे परमभाग्यच समजले जाते. ही संधी (कै). बाबुराव जोशी, भाई राऊळ यांच्यापासून ते माझ्यापर्यंत अनेकांना मिळाली. यामध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक आणि (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांनी सर्वाधिक काळ प्रतिनिधीत्व केले. 1985 ते 2009 पर्यंत सुधाकर परिचारक हे सलग 25 वर्षे आमदार होते. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत खऱ्या अर्थाने परिचारक यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करुन विजय मिळवला. त्यानंतर 2014 मध्ये प्रशांत परिचारक आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा थेट पराभव करुन आमदार भालके यांनी हॅट्रीक केली. 

जिल्ह्याच्या राजकारणात (कै.) शंकरराव मोहिते पाटील आणि (कै.) नामदेव जगताप असे दोन मातब्बर गट होते. (कै) औदुंबर आण्णा पाटील हे (कै.) नामदेव जगताप गटाचे तर माजी आमदार सुधाकर परिचारक हे मोहिते पाटील गटाचे. पंढरपूरमध्ये पाटील आणि परिचारक असे दोन मातब्बर गट. सक्रीय होते. (कै.) औदुंबर पाटील यांच्या नंतर त्याचे पुत्र राजाभाऊ पाटील यांनी 1995 साली कॉंग्रेस पक्षात बंडखोरी करत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी औदुंबरआण्णा पाटील हे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. एकीकडे मुलाची बंडखोरी तर दुसरीकडे पक्षशिस्त अशा कात्रीत ते अडकले होते. परंतु राजकीय तत्वनिष्ठ आणि शरद पवार यांच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या (कै.) औदुंबर आण्णा पाटील यांनी पक्षनिष्ठा म्हणून स्वतःच्या मुलाच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार असलेले सुधाकर परिचारक यांचा त्यांनी प्रचार केला होता. त्यावेळी औदुंबरआण्णा पाटील घरी शांत बसले असते तरी त्यांचा मुलगा (कै.) राजाभाऊ पाटील हे सहज निवडून आले असते अशी, त्यावेळची राजकीय परिस्थिती होती. परंतु त्यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून परिचारकांचे काम केले. परिचारकांना निवडून आणण्यात (कै.) औदुंबरआण्णा पाटील यांचा मोठा वाटा होता. तरीही (कै.) औदुंबरआण्णा पाटील यांच्यावर परिचारकांनी पुत्र प्रेमाचा आरोप केला होता. 

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार सुधाकर परिचारक हे शरद पवारांना भेटण्यास मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांनी भेटी दरम्यान शरद पवारांसमोरच शड्डू मारत, तुमच्या राजाभाऊला पाडून आलोय, अशी खोचक टिप्पणी केली होती. परिचारकांची ही खोचक टिप्पणी (कै.) औंदुबर पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना असह्य झाली होती. तेव्हापासून 1995 ते 2019 पर्यंत पाटील विरुद्ध परिचारक या दोन गटात निवडणुका झाल्या आहेत. 
2009 झाली पहिल्यांदा (कै.) औंदुंबर आण्णा पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून मला पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील जनतेने निवडून दिले. 2014 साली प्रशांत परिचारकांचा तर 2019 मध्ये सुधाकर परिचारकांचा पराभव केला. 25 वर्षापूर्वी (कै) पाटील यांच्या मुलाचा पराभव केला म्हणून शरद पवार यांसमोर शड्डू ठोकणाऱ्या परिचारकांचा पराभव केल्यानंतर मी भर शिवाजी चौकात परिचारकांच्या विरोधात दंड थोपटले होते. आमदार भालकेंनी प्रथमच थंड थोपटलेल्या घटनेचा घटनेचा उलगडा केल्याने याचे विरोधी परिचारक गटातून कसे पडसाद उमटतात हे देखील पाहाणे औत्सुक्‍याचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com