

MLA Says Separate Male and Female Leopards Instead of Sterilization
Esakal
राज्यात अनेक भागात बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात लहान मुलं, वृद्धांचे बळी गेले आहेत. बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांकडून केली जात आहे. दरम्यान, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या वेशात विधानभवन परिसरात जात या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतलं. प्राणी जसा महत्त्वाचा आहे तसं माणसांचा जीवही महत्त्वाचा असल्याचं आमदार सोनवणे म्हणाले.