"बरं झालं तुम्ही मनसे..."; रोहित पवारांनी वसंत मोरेंच्या कानात सांगितलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More- Rohit Pawar

"बरं झालं तुम्ही मनसे..."; रोहित पवारांनी वसंत मोरेंच्या कानात सांगितलं

पुणे : 'पुरंदर प्रतिष्ठान’च्या वतीने शनिवारी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण व चमकदार कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना ‘छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मनसेचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनाही जाहीर झाला होता. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

(MNS Vasant More And Rohit Pawar)

दरम्यान या कार्यक्रमासाठी महाविकासआघाडीचे नेते उपस्थित होते. वसंत मोरे यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "हे माझ्या कामाचं फळ आहे, संजय जगताप, सुप्रिया सुळे या सगळ्यांनी माझ्या कामाची चर्चा केली." असं म्हणत त्यांनी कार्यक्रमावेळी रोहित पवारांनी आपल्या कानात काय सांगितले याचं स्पष्टीकरण दिलं. मोरे म्हणाले की, "तुम्ही एक गोष्ट चांगली केली की, बरं झालं तुम्ही मनसेत राहिलात." असं रोहित पवार यांनी आपल्या कानात सांगितलं असं ते म्हणाले.

हेही वाचा: आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणण्याची वेळ बाळासाहेबांवर आली नाही - दानवे

"आज सायंकाळी पुण्यात मनसेचा शहर मेळावा असून या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका मला रात्री १२.३० ला दिली. या मेळाव्यात जाणार का नाही याचा निर्णय मी अजून घेतला नाही. कारण कार्यक्रम पत्रिकात ११ जणांची कोर कमिटी आहे पण पत्रिकेत माझं नाव नाही." असं ते म्हणाले. दरम्यान महापालिका निवडणुका काही दिवसांत जाहीर होणार असून त्यासाठी त्यांची तयारी असल्याचं दिसतंय.

त्यांना पक्षाच्या कार्यक्रमातून वगळण्यात येत असल्याचं पहायला मिळत असून त्यांनीही पक्षाने शहराध्यक्षपद काढून घेतल्यामुळे नाराज असल्याचं सांगितलं होतं.

Web Title: Mns Vasant More Rohit Pawar Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top