नितेश राणेंची नवीन पोस्ट एक आठवण !

काय म्हटलय नितेश राणेंनी यामध्ये....
Nitesh Rane
Nitesh Rane
Updated on

मुंबई: अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. तोच मुद्दा पकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नारायण राणे (narayan rane) यांची जीभ घसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. नारायण राणेंच्या विधानाविरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी (shivsainik) आक्रमक होत, हिंसक आंदोलन (protest) केली.

कुठे नारायण राणेंच्या पोस्टरला काळं फासलं, कुठे पोस्टर फाडली, प्रतिकात्मक पुतळण्याचे दहन केले. काही ठिकाणी भाजपा कार्यालयांवर हल्ले केले. त्या विधानाबद्दल नारायण राणेंना अटकही झाली होती. पण काहीवेळातच त्यांची जामिनावर सुटका झाली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांचा ज्या मुद्यावरुन गोंधळ झाला होता. तोच धागा पकडून नितेश राणेंनी एक टि्वट केले आहे.

Nitesh Rane
जितेंद्र शिंदेची बदली, अमिताभ वर्षाला बॉडीगार्डला १.५ कोटी द्यायचे का?

या टि्वटमध्ये त्यांनी रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सव कशाला म्हणतात, त्याची माहिती दिली आहे. स्टेशन परिसरात लावलेल्या फलकाचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. नितेश राणेंनी या टि्वटमध्ये वरती एक आठवण असा संदेश लिहिताना हसण्याचा इमोजोही पोस्ट केला आहे.

Nitesh Rane
अनिल परब यांच्या समर्थनाचे बॅनर्स, 'संकटाच्या छाताडावर तांडव...'

नेमकं काय घडलं होतं?

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनतर त्यांनी याबाबत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा विचारणा केली. त्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन असल्याचं सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Merit Over Influence: Three Siblings from Kelghar Earn Prestigious Government Jobs
Women beneficiaries checking their names after e-KYC verification update in Ladki Bahin Yojana, Maharashtra.
Railway Revises Konkan Route Operations for Monsoon; Several Train Schedules Altered
Heatwave Eases as Pre-Monsoon Activity Intensifies Across Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com