छत्रपतींचा अपमान करून इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाका; आमदार शिंदे संतापले I Shashikant Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari Shashikant Shinde

'द्वेषाचं राजकारण करून अनेकांना संपवण्याचं काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत.'

Shashikant Shinde : छत्रपतींचा अपमान करून इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाका; आमदार शिंदे संतापले

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळं सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत. छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीनं एकमुखानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय.

हेही वाचा: कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादात पवारांची एन्ट्री; जत मागणाऱ्या बोम्मईंना दिलं त्यांच्याच शब्दांत उत्तर

आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनीही राज्यपालांवर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमदारांसह कामाख्या देवीला निघाले आहेत. त्यातील काही आमदार इतके कर्तृत्ववान आहेत की, त्यांना देवी प्रसन्नच होणार नाही. खरेतर बेगडी हिंदुत्व असणारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी आणि इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाकण्याची गरज आहे, अशी टीका शशिकांत शिंदेंनी केली. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील हल्लाबोल केला.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील खटाव इथं निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार शिंदे यांनी खटाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. शशिकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे सेनेतील आमदारांसह कामाख्या देवीला निघाले आहेत. त्यातील काही आमदार इतके कर्तृत्ववान आहेत की त्यांना देवी प्रसन्नच होणार नाही. खरंतर बेगडी हिंदुत्व असणारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी आणि इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाकण्याची गरज आहे. तसंच खटाव ग्रामपंचायतीची सत्ताही अपघातानं मिळालेल्या सत्ताधाऱ्यांनी तिरंगा अपघातानं उलटा फडकवला होता. प्रदीप विधातेंच्या विरोधात सगळे मातब्बर एकत्र लढत आहेत. त्यांनी कितीही ताकद लावली तरी विधाते त्यांना पुरून उरतील. द्वेषाचं राजकारण करून अनेकांना संपवण्याचं काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत, अशीही त्यांनी विरोधकांवर टीका केला.