...हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 November 2019

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीय. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे असे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीय. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी घटनेनुसार राज्य चालविणे कठीण असल्याचे म्हटले होते. राज्यातील कलम 356 लागू करण्याची स्थिती असल्याचेही राज्यापालांनी म्हटले होतं. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करेपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ हे निश्चित मानण्यात येत आहे.

कोण आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी? जाणून घ्या 

राज्यपालांच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील जनतेचा हा घोर अपमान आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray criticize Governor decision in Maharashtra