
Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर नवरा-बायकोतही सुरू झाली भांडणं; महाजनांची खोचक टीका
मनसेच्या घे भरारी अभियानाला सुरवात झाली आहे. या अभियानाला संबोधित करताना प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावरही टीका केली आहे. बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष जेव्हा पासून सुरू झाला तेव्हा पासून जातीवाद सुरू झाला असल्याचे महाजन म्हणाले आहेत. नवरा बायकोत सुद्धा भांडण सुरू झाले. सत्तेचा चमचा घेऊन जन्मलेले हे लोक आहेत, अशी खोचक टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.
जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादीने सुरू केलं आहे. संभाजी महाराज धर्मवीर नसल्याचं म्हणत आहेत. अरे तुला इतिहास माहीत आहे का?, असा संतप्त सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. बरं हा (राहुल गांधी) महाराष्ट्रात आल्यावर याच्या अंगात येते. सावरकरांना माफीवीर म्हणतो आणि ज्याचे आजोबा सावरकर यांचे भक्त होते तो त्याला भेटायला जातो असंही महाजन म्हणाले आहेत.
हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
बोलताना प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे बापाचे भांडवल घेऊन पुढे जात आहेत. बापाचं भांडवल घेऊन निघालेला पोरगा नतद्रष्ट निघाला. बाप पाळवण्याची टोळी आली अशा चर्चा सुरू झाल्या. काय त्या पक्षची अवस्था केली आहे, असं सांगतानाच ठाकरे सरकारने काय केले? असा प्रश्न करत कोरोनात काय केलं घरी बसले, अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics : मंत्रिपदासाठी इच्छुक नाही, पण मंत्रिमंडळ विस्तार...; शिंदे गटातील आमदाराचं सूचक विधान
तर उद्धव ठाकरेंच्या सेनेला अंधारेबाई पुढे घेऊन जात आहेत. आता या म्हशीच्या स्वप्नात रेडा येतो. त्याला आम्ही काय करणार? मातोश्री कोणत्या पैशाच्या जोरावर उभी राहिली हे विचारा. असं म्हणत त्यांनी उद्धव साहेब या सुषमा अंधारेने तुमच्या वडिलांना 85 वर्षाचे म्हातारे म्हटले आणि ती तुमच्या सोबत?, असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: सोलापुरात ‘कल्याण’च्या मटक्यात लाखोंची उलाढाल? पोलिस कारवाईनंतरही बंद नाही जुगार