Narendra Modi : मोदींनी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारावा; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

narendra modi
narendra modi

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेले सुतोवाच स्वागतार्ह असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

narendra modi
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! इतर 19 अधिकाऱ्यांचीही ट्रान्सफर; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

याबाबत त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. रेल्वे विकासाबाबत मराठवाड्याला रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तारित प्रकल्प म्हणून जालना - नांदेड नवीन महामार्गाशेजारी बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारण्याची आमची मागणी आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते. आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या विषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आमची मागणी असल्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

narendra modi
Vande Bharat : नांदेड-मुंबई 'वंदे भारत' रेल्वे लवकरच सुरू होणार; चिखलीकरांनी मानले मोदींचे आभार

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई - नांदेड या रेल्वे मार्गावर लवकरच ‘वंदे भारत’ ही अती जलद रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com