Mohan Bhagwat Vijayadashami Speech : ‘विविधतेतील एकता’च विसरल्यामुळे आपण दुर्बल झालो; मोहन भागवतांनी नव्या पिढीला दिला 'हा' संदेश

RSS Nagpur : आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात विजयादशमी उत्सवात विविधतेतील एकता आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश दिला. भारताची विविधता बदलणारी आहे, पण एकात्मता हे अटल आणि शाश्वत सत्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Mohan Bhagwat’s Vijayadashami Address in Nagpur

Mohan Bhagwat’s Vijayadashami Address in Nagpur

esakal

Updated on: 

Mohan Bhagwat’s Vijayadashami Address in Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी नागपुरात विजयादशमी उत्सवातून देशवासीयांना एकता, स्वबोध आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश दिला. ‘एकतेचे तत्त्व अटल आणि शाश्वत आहे, तर आपली विविधता परिवर्तनशील आहे. विविधतेतील एकता विसरल्यामुळे आपण दुर्बल झालो आणि आचरण विसरल्यामुळे आपली दुर्गती झाली,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्याची जबाबदारी नव्या पिढीच्या खांद्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com