Ganeshotsav 2020 : दाते पंचागकर्त्यांनी सांगितला 'बाप्पा'च्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदा गणोशोत्सवाला मोठ्या उत्सवाचे रूप येणार नसले, तरी घरोघरी 'बाप्पा'च्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे.

Ganesh Festival 2020 : पुणे : अवघ्या काही तासांत आपल्या लाडक्या 'बाप्पा'चे आगमन घरोघरी होणार आहे. कोरोनाच्या संकटात 'विघ्नहर्ता' असणाऱ्या गणरायाचे आगमन येत्या शनिवारी (ता.२२) भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजेच पहाटे चार वाजून ४७ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ५७ मिनिटांपर्यंत आपल्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याची माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

Ganeshotsav 2020 : यंदा फुलांनी खाल्ला 'भाव'; हात राखूनच पुणेकरांनी केली खरेदी​

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदा गणोशोत्सवाला मोठ्या उत्सवाचे रूप येणार नसले, तरी घरोघरी 'बाप्पा'च्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. घरातील गणोशोत्सवाच्या तयारीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत प्रत्यक्ष भाविकांची दरवर्षीप्रमाणे तुडुंब गर्दी नसली तरी ऑनलाइन बाजारपेठेत मात्र सजावटीच्या साहित्यांची ऑर्डर मोठ्या संख्येने बुक होत आहेत.

मागच्या वर्षी विसर्जनाच्या वेळेस आपण केलेल्या ‘पुढच्या वर्षी लवकर या..’ या प्रार्थनेनुसार यंदा 'बाप्पा' ११ दिवस लवकरच येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते.

अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!​

तर येत्या मंगळवारी (ता.२५) अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी एक वाजून ५९ मिनिटांनंतर गौरी आवाहन करता येणार आहे. तर बुधवारी (ता.२६) आपल्या परंपरेनुसार गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर गुरुवारी (ता.२७) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा नसते मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल, असे दाते यांनी सांगितले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohan Date given information about worship of Ganapati Bappa