Monsoon 2025: आनंदाची बातमी ! मान्सून महाराष्ट्रात दाखल, 12 दिवस आधीच आगमन; पुणे-मुंबईत लवकरच हजेरी

Monsoon 2025: शनिवारी मान्सून गोव्याच्या किनाऱ्यावर दाखल झाला होता. यांनतर मान्सून कोकणात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये राज्यात दाखल झाला आहे.
Heavy clouds and rain showers mark the early arrival of Monsoon 2025 in Maharashtra, bringing relief to farmers and residents across the state.
Heavy clouds and rain showers mark the early arrival of Monsoon 2025 in Maharashtra, bringing relief to farmers and residents across the state.
Updated on

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवारी (दि.25) आगमन झाले. हवामान खात्याकडून रविवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. कालच मान्सून गोव्याच्या किनाऱ्यावर दाखल झाला होता. यांनतर मान्सून कोकणात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये राज्यात दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com