Monsoon Active Again: मॉन्सून पुन्हा सक्रिय! रायगड, पुण्यापर्यंत पोहोचला, ४८ तासात मुंबईत दाखल होणार

Monsoon Update Maharashtra: दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर अखेर सोमवारी मान्सूनची उत्तरेच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रायगडसह पुण्याचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
Monsoon Update 2026

Monsoon Update 2026 Southwest Monsoon Advances Across Pune Raigad Set to Enter Mumbai Soon

Esakal

Updated on

IMD Monsoon Forecast: दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर मान्सूनची वाटचाल रखडली होती. १० जूनपासून पावसाने दडी मारली होती. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे कडक ऊन यामुळे बळीराजासमोर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं. दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर अखेर सोमवारी मान्सूनची उत्तरेच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनने सोमवारी अलिबागसह पुण्यापर्यंतचा भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com