मॉन्सून आज केरळात दाखल होणार

अंदमान बेटांवर २१ मे रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेगाने सरकत त्याने संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह व्यापला होता. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने पुढील वाटचाल करत आहे.
Monsoon
MonsoonSakal

पुणे - अरबी समुद्राचा (Arabian Sea) पूर्वमध्य भाग व कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची (Wind) स्थिती निर्माण झाल्याने नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण (Environment) तयार झाले आहे. श्रीलंका, मालदीव व कोमोरीनचा भाग शनिवारी (ता. २९) मॉन्सूनने व्यापला. उद्या (ता. ३०) मॉन्सून केरळात (Keral) दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. (Monsoon Enter in Keral)

अंदमान बेटांवर २१ मे रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेगाने सरकत त्याने संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह व्यापला होता. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने पुढील वाटचाल करत आहे. मॉन्सूनच्या प्रवाहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. मागील तीन दिवसांपासून श्रीलंका, मालदीव व कोमोरीन भागांत नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले आहेत. आज (रविवारी) आणखी काही भागांच चे मजल मारण्याची शक्यता असून, उद्या केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सध्या अरबी समुद्राच्या दक्षिण भाग व मध्य भागात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे.

Monsoon
पतीच्या शौर्याचा वारसा समर्थपणे पेलणारी लेफ्टनंट निकिता

पावसाला राज्यात पोषक वातावरण

पुणे - देशाच्या दक्षिण भागाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल होत असताना राज्यात कडाक्याचे ऊन पडले आहे. विदर्भात पारा कमालीचा वाढला असून, मार्चनंतर पुन्हा एकदा पारा ४४ अंशांपर्यंत गेला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी सरी बरसतील. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे आज सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सध्या राज्यात आकाश निरभ्र असले तरी पावसाचे आगमन लवकरच होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात ४० अंशांच्या खाली आलेला पारा पुन्हा वाढला आहे. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. तर अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी भागांत कमाल तापमान सरासरीएवढे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com