मॉन्सूनची चाल मंदच, राज्यात 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

IMD Monsoon Forecast हवामान विभागाने मराठवाड्यात १५ जून पर्यंत पावसाचा जोर वाढणार नसल्याचं सांगितलंय. राज्यात ११ ते १८ जून या कालावधीत कमी प्रमाणात पाऊस राहील असा अंदाज वर्तवलाय.
IMD Predicts Weak Rainfall Across Maharashtra This Week

IMD Predicts Weak Rainfall Across Maharashtra This Week

Esakal

Updated on

नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन चार दिवस झाले तरी पुढे सरकलेला नाही. कोकणात मान्सूनने ७ जूनला एन्ट्री केली. तरी तिथून पुढे मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. संथ गतीने मान्सून पुढे सरकत असल्यानं महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो. हवामान विभागाने मराठवाड्यात १५ जून पर्यंत पाऊस वाढणार नसल्याचं सांगितलंय. ११ ते १८ जून या कालावधीत पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज वर्तवलाय. १८ जून नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय. Slow Monsoon Advance Keeps Farmers Waiting for Rain

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com