राज्यात 2 लाखांहून अधिक रिक्त पदे; पदोन्नतीही रखडल्या

vacancy
vacancyesakal

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : अनेक वर्षांपासून नोकरभरती नसल्याने राज्य शासकीय कार्यालये व जिल्हा परिषदांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. विविध प्रशासकीय विभागातील रिक्त पदांचा अतिरिक्त ताण यंत्रणेवर पडतो आहे. परिणामी, अनेक कामे संथगतीने होतात. अनेक खात्यात ऑनलाइन सुविधा उपलब्ध असली तरीही मॅन्युअल बाबी पडताळणीस मनुष्यबळ लागते. त्यामुळे ‘सरकारी काम चार महिने थांब’, असा प्रत्यय अनेक विभागात येतो. रिक्त पदांपैकी एक लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत. (More-than-two-lakh-vacancies-in-state-nashik-marathi-news)

स्पर्धा परीक्षा उमेदवारांना भरतीची प्रतीक्षा

राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना भरतीची प्रतीक्षा आहे. कोविडमुळे दीड वर्षात अडथळा निर्माण झाला असला तरी मागील काही वर्षांपासून राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामकाज करून ढकलगाडी चालते आहे. आरोग्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर सरकारी रुग्णालयांवर ताण पडला. त्यामुळे अनेक योजनांच्या कारवाईसह प्रशासकीय कामकाजात गती येत नाही. विशेषतः सर्वाधिक रिक्त पदांमध्ये गृह विभाग येत असला तरी ग्रामीण भागातील सर्वदूर असलेल्या जिल्हा परिषद शाळांतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांची प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असून, मे व जून महिन्यांत सर्वाधिक निवृत्त होणाऱ्यांत शिक्षण विभाग आघाडीवर आहे. गृह विभागातील २४ हजार ५८१, सार्वजनिक आरोग्य विभागातील २० हजार ५४४, जलसंपदा विभागातील २० हजार ८७३ पदे रिक्त आहेत. राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांची मिळून लाखो पदे रिक्त असताना राज्य शासनाकडून कंत्राटी भरती करून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरतीप्रक्रिया राबविण्याची बेरोजगार तरुणांची अपेक्षा आहे. कोविडच्या लाटेत दोनवेळा परीक्षा रद्द करावी लागली.

vacancy
अनलॉकमुळे नाशिकच्या औद्योगिक जगतात आनंदाचे वातावरण
vacancy
नाशिकमध्ये बससेवेला प्रवाशांचा अल्‍प प्रतिसाद

कार्यालये व जिल्हा परिषद मंजूर पदे ः दहा लाख ९९ हजार १०४

कार्यरत पदे ः आठ लाख ९८ हजार ९११

रिक्त पदे ः दोन लाख १९३

रिक्त पदांचा तपशील

‘अ’ वर्ग - दहा हजार ५४५

‘ब’ वर्ग - २० हजार ९९९

‘क’ वर्ग - एक लाख २७ हजार ७०५

‘ड’ वर्ग - ४० हजार ९४४

कोविडसारख्या महामारीत अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. विविध संसर्ग व नियमित लसीकरण, आरोग्य उपक्रम राबवावेच लागतात. भरतीसह पदोन्नतीची कारवाई व्हावी. -भटू शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष, आरोग्य अधिकारी व कर्मचारी संघटना, नाशिक

राज्य सरकारने सर्वच रिक्त पदांबाबत तातडीने निर्णय घ्यावा. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे नियोजन करावे. शिक्षण क्षेत्रातील पदांचीही कारवाई व्हावी. -साजीद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय ऊर्दू शिक्षक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com