
खासदार संभाजीराजेंनी काँग्रेसमध्ये यावं; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji) यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे. मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमधून आमदार म्हणून चांगले काम केले. संभाजीराजे लवकरच आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जर ते काँग्रेसमध्ये आले तर स्वागत आहे, असे सुतोवाच पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले. (MP Sambhaji should join Congress)
शाहू मिल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे (Sambhaji) यांनी मुंबईत आंदोलन केले होते. त्यासंदर्भात त्यावेळी त्यांच्याशी बोलणे झाले होते. मात्र, त्यांच्या आगामी भूमिकेविषयी माहिती नाही. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचे भाऊ मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसचे (Congress) आमदार म्हणून चांगले काम केले, असे सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले.
हेही वाचा: रशिया, युक्रेन युद्धावर PM मोदींनी स्पष्ट केले भारताचे मत
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मी मालोजीराजे यांची भेट घेऊन त्यांना प्रचारात सक्रिय होण्यास विचारले होते. मालोजीराजे यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला व त्याचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे आता संभाजीराजे (Sambhaji) छत्रपती जर काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.
भोंग्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
राज ठाकरे यांची सभा परवानगी घेऊन झाली. त्यांना काही नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. त्यातील कोणत्या नियम आणि अटींचा भंग झाला आहे हे निश्चित करण्यासाठी ठाकरे यांच्या भाषणाचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवले जाईल. भोंगे लावण्याबाबत उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे राज ठाकरे यांच्या सभेबाबत विचारले असता पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
Web Title: Mp Sambhaji Should Join Congress Satej Patil Kolhapur Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..