Exclusive : सुप्रिया सुळे म्हणतात, ''आता 'ही' लाईफस्टाईल स्वीकारू!''

Supriya-Sule
Supriya-Sule

पुणे : ‘लाईफ इज ब्युटीफुल’ पण कोरोनामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य आता बदलणार आहे. लाईफस्टाईलमध्येही बदल होणार असून तंत्रज्ञानाचा वापर करून ते आपण स्वीकारले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. सोमवारी (ता.२०) 'फेसबुक लाईव्ह'मध्ये त्यांनी नेटिझन्सशी संवाद साधला.

या लाईव्हमध्ये सुळे यांनी कोरोनामुळे दैनंदिन जीवनात होत असलेले बदल आणि त्याची भविष्यातील दिशा याचा अचूकपणे वेध घेत सज्ज राहण्यास सांगितले अन् त्याबाबत मार्गदर्शनही केले. 

सुळे म्हणाल्या, "अजून १५ दिवसच लॉकडाउन आहे. त्यामुळे छोट्या गोष्टीही आता महत्त्वाच्या आहेत. नियतीच्या मनात काहीतरी असेल म्हणून तिने आपल्याला थोडंसं ‘चेक्स इज बॅलन्स’ मध्ये जगायला शिकवलं. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळते. मी अनुभवातून शिकते. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात बदल करणार आहे." 

कोरोनाच्या संकटावर मात केल्यावर दैनंदिन आयुष्यात बदल नक्की करु आणि या कोरोनाच्या विरोधातील जो लढा आहे, तो आपण सगळे मिळून नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला. 

स्वतः ला बोअर करून घेऊ नका. लॉकडाऊन संपल्यावर काय काय करु शकतो, यावर विचार करायची गरज आहे. महाराष्ट्रात कुणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकता कामा नये. सोशल डिस्टनसिंग पाळावी, हात धुवावेत या किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्या आपल्या आईवडीलांनी, आजी-आजोबांनी आयुष्यभर आपल्याला सांगितल्या आहेत. त्या आपण पाळायला हव्यात. गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की करु नये या सगळ्या गोष्टी नवीन लाईफस्टाईलमध्ये अर्थात ‘पोस्ट कोरोना इरा’ मध्ये पुन्हा कराव्या लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

आम्ही सध्या कुठलाही पक्ष नाही, तर फक्त माणुसकी पाहत आहोत. तुम्हीही सहकार्य करत आहात. घरात ३०-३५ दिवस राहणं सोपं नाही, आपण सगळे अडचणींवर मात करतोय. त्यामुळे हा प्रश्न सुटल्यावर नक्की चांगलं घडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.  

या काळात आम्हाला राजकारण करायचं नाहीय, तर समाजकारण करायचं आहे असे सांगतानाच, "मोदी सरकारच्या सूचनांचे पालन करून हातात हात घालून राज्य सरकार २४ तास त्याचे पालन करीत आहे. आमच्याही सूचनांवर सरकार कार्यरत आहे. 'अतिथी देवो भव'नुसार आपल्यासाठी आपल्या राज्यात येऊन काम करणारे मजूर असो वा अन्य कोणी, प्रत्येकाचा राज्यात मानसन्मान केला जात आहे. त्याला अन्नधान्याची मदत केली जात आहे. या  महाराष्ट्रात कुणालाही उपाशी राहू देणार नाही." 

गेले ३० दिवस मतदारसंघात इच्छा असूनही जायला मिळत नाहीय. माझ्या आयुष्यात खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडलं आहे. मात्र तरीही झूम कॉल, मोबाईल, लॅण्डलाईनवरून २४ तास देशात, राज्यात आणि मतदारसंघात जनतेशी, संघटनेतील लोकांशी संपर्कात आहे. अन्नधान्याची अडचण येत आहे. त्यासाठी पवार साहेब देशाचे अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याशी सातत्याने संपर्क करत आहेत. शिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेही अन्न धान्य कमी पडू नये म्हणून सतत काम करत आहेत.

जनतेशी संवाद साधत आहेत. अधिकारी वर्गाशी संपर्क करत आहेत. काहीजण टीका करीत असले तरी, महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी राहणार नाही, याची ग्वाही देत या काळात राजकारण करणार नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.  नेटिझन्सच्या प्रश्नांनाही सुळे यांनी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे उत्तरे देत संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com