उदयनराजेंवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचे 'राजेंना' समर्थन!

उदयनराजेंवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचे 'राजेंना' समर्थन!

सातारा : काही दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. छत्रपतींच्या गादीबद्दल आदर असल्याचंही संजय राऊत यांनी आवर्जून सांगितलं. पण, उदयनराजे हे भाजपचे नेते आहेत, विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र, आज (मंगळवार ता. २९) खासदार संजय राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही 'राजे' आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे, असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही, अशी भूमिका मांडली. या ज्यांच्या-त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत', असं म्हणत शिवसेनेनं दोन्ही राजांची बाजू घेतली आहे. राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत होत असलं तरी, यापूर्वी राऊतांनी उदयनराजेंकडे थेट छत्रपतींच्या वंशजाचा पुरावे मागितला होता. मात्र, आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी उदयनराजे हे छत्रपतींचे वंशज असल्याचे स्वीकारलेले दिसत आहे. 

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेनंतर नुकतीच (दोन दिवसांपूर्वी) खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तब्बल दोन तास प्रदीर्घ चर्चा केली. याची महाराष्ट्रभर, सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरु झाली असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट संकेत देत, राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचे सांगितले. त्यातच राऊतांनी भाजपाचे खासदार उदयनराजे-संभाजीराजेंबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत दोन्ही राजांच्या भूमिकेचे स्वागतच केले. त्यामुळे तर्कवितर्कांना ऊत आला आहे. अद्याप मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांनी राऊतांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे समर्थन केले नसले तरी, त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली नाही, त्यामुळे राज्यात 'राजकीय भूकंप' होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मराठा आरक्षणावरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रही ढवळून निघाले आहे. साता-याचे खासदार उदयनराजे व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्या स्वत:च्या भूमिका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यामध्ये खासदार संजय राऊतांनी देखील उडी घेतली आहे. 'सातारा, तसेच कोल्हापूरच्या 'राजां'नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे' असं म्हणत शिवसेनेनं मराठा आरक्षणावरून राजकारण करणाऱ्यांना फटकारून काढले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेवर भाष्य करण्यात आले आहे.

'मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल, तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याचवेळी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 'सातारकरां'पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी साफ सांगितले आहे. उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही 'राजे' आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत', असं म्हणत शिवसेनेनं दोन्ही राजांची बाजू घेतली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना थेट छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. त्यावर उदयनराजेंचे चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, की अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये आम्ही कोणत्या घरात जन्मलो ते. त्यापलीकडे संजय राऊतांना कोणता पुरावा हवा आहे, हे त्यांनी सांगावं. "हा सगळा वाद संजय राऊतांनी सुरू केला आहे. याबाबत ना आम्ही काही बोललो होतो, ना संभाजीराजे काही बोलले होते, ना उदयनराजे. त्यामुळे हा वाद मिटवायचा कसा हे संजय राऊतांनीच पाहावं, असंही शिवेंद्रराजे भोसले यांनी राऊतांना ठणकावलं होतं.

उदयनराजेंवर आतापर्यंत अनेकदा टीका झाली आहे. पण, छत्रपतींचे थेट वंशज असल्याचे पुरावे मागणा-या राऊतांची टिका जनतेच्या जिव्हारी लागली होती. त्याचे पडसादही संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. आता दस्तुरखुद्द संजय राऊतांनीच उदयनराजेंना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस असल्याचे स्वीकारल्याचे सामनाच्या अग्रलेखातून दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com