MPSC सचिवपदी सौरभ कटियार, अध्यक्षपदाचा कार्यभार कुणाकडे सोपवणार?

MPSC News: एमपीएससी सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही इतर सदस्यांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजते.
MPSC Saurabh Katiyar

Sourabh Katiyar

Esakal

Updated on: 

MPSC Saurabh Katiyar: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणानंतर आयोगात फेरबदल केले जात आहेत. आय़ोगाचे अध्यक्ष भीमनवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन झाल्यानंतर भीमनवार हे रजेवर गेले आहेत. चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या सचिव पदी आयएएस तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केलीय. दरम्यान, आता एमपीएससी आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली झाल्यानं हे पद रिक्त होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com