"एसईबीसी'च्या जागांवर अडकला पूर्व परीक्षांचा निकाल ! "एमपीएससी'ने मागितले सरकारकडून मार्गदर्शन 

MPSC
MPSC
Updated on

सोलापूर : राज्य सेवेची पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. आता 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षांच्या निकालासाठी "एसईबीसी' प्रवर्गातील जागा खुल्या की अन्य कोणत्या प्रवर्गात वर्ग केल्या जातील, त्याबद्दल आयोगाने राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला राज्य सरकारने "एसईबीसी'चे आरक्षण दिले. मात्र, आरक्षणाच्या निर्णयावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तत्पूर्वी, आयोगाकडून घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी त्या प्रवर्गातील जागांचा तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, आयोगाने आता पूर्व परीक्षांची उत्तरपत्रिका जाहीर केली असून 8 एप्रिलपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर एक्‍स्पर्ट कमिटीच्या माध्यमातून त्या हरकतींवर निर्णय होऊन अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली जाईल. त्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षांचा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. कोरोना व आरक्षणाच्या स्थगितीमुळे आयोगाच्या परीक्षांना तब्बल एक वर्षाचा विलंब झाला आहे. आता आयोगाने विचारलेल्या बाबीवर राज्य सरकारने वेळेत मार्गदर्शन न केल्यास आणि "एसईबीसी'च्या जागांसंदर्भात नवीन नोटिफिकेशन न काढल्यास निकाल लांबणीवर पडू शकतो, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. 

आयोगाकडून "या' बाबींची पडताळणी 

  • "एसईबीसी'तील सर्वच उमेदवारांनी ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गाचे पर्याय निवडल्याची केली जाणार खात्री 
  • खुल्या प्रवर्गातून ईडब्ल्यूएसमध्ये गेलेल्या उमेदवारांच्या पात्रतेची होईल पडताळणी 
  • "एसईबीसी'तून खुल्या प्रवर्गात गेलेल्या उमेदवारांची पडताळली जाईल वयोमर्यादा 
  • मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे "एसईबीसी'च्या जागांबाबत राज्य सरकारकडून काय निर्णय होईल, त्यानुसार जाहीर होणार पूर्व परीक्षांचा निकाल 
  • "ईडब्ल्यूएस'अंतर्गत भरल्या जाणार 10 टक्‍के जागा; "एसईबीसी'च्या उमेदवारांना त्या प्रवर्गातून संधी मिळू शकते की नाही, याची होईल पडताळणी 

'वित्त'च्या मान्यतेनंतरही पदभरती अडकली 
कोरोना काळात अत्यावश्‍यक सेवेसाठी वैद्यकीय व मेडिकल विभागाला मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली. दुसरीकडे कोरोना काळात अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले तर काहीजण सेवानिवृत्त झाले. या पार्श्‍वभूमीवर वित्त विभागाने या तिन्ही विभागांमधील रिक्‍त पदांची भरती करण्यास मान्यता दिली. मात्र, संबंधित विभागासमोर पात्र उमेदवारांना नियुक्‍ती देताना मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या विभागांची पदभरती पुढे सरकत नसून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या नियुक्‍त्या रखडल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com