

Devendra Fadnavis
esakal
मुंबई : ‘‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा राज्य सरकारचा विचार असून, आगामी परीक्षेत यापूर्वीचे सर्व विक्रम मोडतील एवढ्या मोठ्या संख्येने पदे उपलब्ध करून देण्यात येतील,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक ऐवजी बहुपर्यायी पद्धतीने घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत समितीने शिफारस केल्यास राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे संकेतही फडणवीस यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकार ‘एमपीएससी’मार्फत उपलब्ध होणाऱ्या पदांची संख्या वाढविण्यावर काम करीत आहे.
विशेषतः गट ‘क’मधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरण्यावर भर आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था किंवा ही भरतीही एमपीएससीमार्फत करण्याबाबतचा निर्णय लवकर घेतला घेतला जाईल. एमपीएससीच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी स्थापण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा आढावा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
या समितीकडे विद्यार्थ्यांकडून एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. या परीक्षा वर्णनात्मक ऐवजी बहुपर्यायी घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापूर्वी दळवी समितीचा वर्णनात्मक परीक्षा घेण्याचा अहवाल स्वीकारला. मात्र आता विद्यार्थी संघटनांचा आग्रह व व्ही. राधा समितीने शिफारस केली तर पुन्हा बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याचा शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचीदेखील पाठराखण केली. ते म्हणाले, की ‘एमपीएससी’तील गैरव्यवहार ते या पदावर रुजू होण्यापूर्वी झाले आहेत. त्यांच्या कामाचे मूल्यमापन न करता केवळ राजकीय हेतू ठेवून त्यांना हटविण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.