esakal | 'MPSC'वर 50 टक्‍के उपस्थितीची 'आपत्ती'! ऑगस्टमध्ये निकाल अन् मुलाखती
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

सध्या कार्यालयांमध्ये 50 टक्‍के उपस्थितीची अट असल्याने त्या कामकाजाला विलंब लागत आहे.

'MPSC'वर उपस्थितीची 'आपत्ती'! ऑगस्टमध्ये निकाल अन् मुलाखती

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर तब्बल 12 परीक्षांचे निकाल पुन्हा लावले जाणार आहेत. आयोगाचे कामकाज 31 जुलैपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. मात्र, सध्या कार्यालयांमध्ये 50 टक्‍के उपस्थितीची अट असल्याने त्या कामकाजाला विलंब लागत आहे. त्यामुळे ही अट शिथिल करावी, असे पत्र आयोगाच्या सचिवांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहे.(MPSC results and interviews will be held in august)

हेही वाचा: MPSC : निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे पुण्यात चक्काजाम आंदोलन

राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वनसेवा, अभियांत्रिकीच्या मुख्य परीक्षा पार पडल्या आहेत. तर स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती झालेल्या नाहीत. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल घोषित झालेला नाही. तसेच संयुक्‍त पूर्व परीक्षाही रखडली आहे. पुण्यातील स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येनंतर सरकारने कामकाज गतीमान करून प्रलंबित विषय जुलैअखेर मार्गी लावण्याचे आयोगाला सूचविले आहे. परंतु, कोरोना आणि डेल्टा प्लसमुळे निर्बंध पुन्हा कडक केले आहेत.

हेही वाचा: MPSC सदस्य निवडीचा पेच ! 7000 हून अधिक उमेदवार मुलाखतीच्या प्रतीक्षेत

शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी उपस्थितीवरही निर्बंध आहेत. त्यामुळे आयोगाला प्रलंबित निकाल पुन्हा जाहीर करून पुढील कार्यवाही करण्यासाठी किमान दीड ते दोन महिने लागतील, असा अंदाज आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवा समजून आयोगातील 100 टक्‍के कर्मचाऱ्यांना उपस्थितीस परवानगी दिल्यास जुलैअखेर प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: MPSC: 'नुसतीच घोषणा नको, अंमलबजावणी करा'

आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठविलेल्या पत्रावर आता सोमवारी (ता. 12) निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना किमान तीन महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यामुळे ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होईल तर संयुक्‍त पूर्व परीक्षेला आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिल्यास सप्टेंबरमध्ये ही परीक्षा घेण्याची तयारी असल्याचेही आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: MPSC : एसईबीसी संवर्गातील उमदेवारांच्या वयोमर्यादेत वाढ

उमेदवारांच्या ऑगस्टमध्ये मुलाखती

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर 'एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार आता मुख्य परीक्षा झालेल्या वनसेवा, अभियांत्रिकीचा निकाल पुन्हा जाहीर केला जाणार आहे. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ऑगस्टमध्ये घेण्याच्या दृष्टीने आयोगाचे नियोजन सुरू आहे. तर पशुसंवर्धन विभागाच्या मुलाखती झालेल्या नाहीत. आता नव्या बदलानुसार जे विद्यार्थी मुलाखतीसाठी वाढतील, त्यांच्यासह सर्वांच्या मुलाखती ऑगस्टमध्येच होणार आहेत.

loading image