'MPSC'ने घेतला महत्त्वाचा निर्णय; निकालाच्या पारदर्शकेसाठी उचललं मोठं पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

'एमपीएससी'ने निकालात पारदर्शकता आणण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे उचलल्याने उमेदवारांना याचा फायदा होणार असून, 1 ऑक्‍टोबर 2020 नंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

'MPSC'ने घेतला महत्त्वाचा निर्णय; निकालाच्या पारदर्शकेसाठी उचललं मोठं पाऊल

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) निकाल जाहीर केल्यानंतर उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकेची मुळप्रत स्कॅन करून त्यांच्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे निकालाबाबत साशंकता असल्यास त्वरित त्याची पडताळणी करणे शक्‍य होणार आहे.

प्राध्यापकांच्या प्रमोशनला 'ब्रेक'; राज्य शासनाच्या आदेशाकडे पुणे विद्यापीठाचं दुर्लक्ष

'एमपीएससी'ने निकालात पारदर्शकता आणण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे उचलल्याने उमेदवारांना याचा फायदा होणार असून, 1 ऑक्‍टोबर 2020 नंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
'एमपीएससी'तर्फे घेतल्या जाणाऱ्या बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल चॉइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) स्वरूपाच्या सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना दोन भागात उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. परीक्षा झाल्यावर भाग एक आयोगाकडे जमा केला जातो, तर भाग दोन (कार्बन कॉपी) हा उमेदवारांना सोबत घेऊन जाता येतो.

'आरपीआय'च्या जिल्हाध्यक्षाने उकळली खंडणी; दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात​

परीक्षा झाल्यानंतर कार्बन कॉपीवरून विद्यार्थी त्यांचे किती प्रश्‍न बरोबर आले, किती चुकले आहेत हे बघून त्यावरून गुणांचा अंदाज काढत असतात. काही वेळेला परीक्षेचा निकाल लांबल्याने अनेकांना निकालानंतर कार्बन कॉपी सापडत नाही, अशा वेळी उमेदवार आयोगाकडे उत्तरपत्रिकेची मागणी करतात. तसेच प्रत उपलब्ध नसताना निकालाबाबत आक्षेप नोंदविला जातो. हा गोंधळ टाळण्यासाठी 'एमपीएससी'ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगातर्फे परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर उमेदवारांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये मूळ उत्तरपत्रिका स्कॅन करून उपलब्ध दिली जाणार आहे.

'सवाई' महोत्सव होणार की नाही? वाचा आयोजकांचे काय म्हणणे आहे?

एमपीएससी स्टुडंट्‌स राइट्‌सचे प्रतिनिधी महेश बडे म्हणाले, "आयोगाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी होईल आणि आयोगाने पारदर्शकपणे निकाल लावल्याचेही स्पष्ट होईल. हा महत्त्वाचा निर्णय आहे.''

- मूळ उत्तरपत्रिकेची इमेज मिळेल.
- निकालाकरिता गृहीत धरलेले एकूण गुण व मिळालेले गुण याची पडताळणी सहज करता येईल.
- उमेदवारास पात्र असलेल्या प्रवर्गासाठी गुणांची किमान सीमांकन रेषा स्पष्ट होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)